“ज्यांना हिंदी शिकायची आहे त्यांनी…”, भाषा वादावर स्वप्नील जोशीने व्यक्त केलं मत; म्हणाला…
राज्यात हिंदी सक्तीच्या निर्णयावरून मराठी विरुद्ध हिंदी भाषावाद सुरू आहे. अनेक मराठी कलाकारांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. अभिनेता स्वप्नील जोशीनेही यावर आपले मत व्यक्त केले आहे. त्याने म्हटले की, हिंदीची सक्ती असू नये, ज्यांना शिकायचे आहे त्यांनी शिकावे. सरकारने वाढता विरोध पाहून हिंदी सक्तीचे जीआर रद्द केले.