“राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर…”, तेजस्विनी पंडीतने व्यक्त केलं मत; म्हणाली…
मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर सक्रीय असून, ती राजकीय आणि सामाजिक विषयांवर मतं व्यक्त करते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने राज ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास महाराष्ट्र खूप प्रगती करेल असे मत व्यक्त केले. तिने राज ठाकरेंच्या व्हिजनचे कौतुक केले. तसेच, तिने पूर्वीच्या राजकारणातील नैतिकतेचे महत्त्वही अधोरेखित केले. तेजस्विनी लवकरच 'ये रे ये रे पैसा ३' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.