तुषार घाडीगावकरच्या आत्महत्येनंतर विशाखा सुभेदार यांची पोस्ट; म्हणाल्या, “हे दुष्टचक्र…”
लोकप्रिय मराठी अभिनेता तुषार घाडीगावकरने २० जून रोजी आत्महत्या केली. मानसिक तणावामुळे त्याने हे पाऊल उचलले. तुषारच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आणि मानसिक आरोग्याबद्दल पोस्ट शेअर केल्या. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी आर्थिक मदतीसाठी फंड असावा, अशी मागणी केली. त्यांनी कलाकारांसाठी आर्थिक मदतीच्या योजनांची गरज व्यक्त केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.