वरण-भाताला गरिबांचं जेवण म्हणणाऱ्या विवेक अग्निहोत्रींवर महेश टिळेकरांचा संताप, म्हणाले…
बॉलीवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सध्या मराठी जेवणाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. त्यांनी मराठी जेवण गरिबांचं आणि शेतकऱ्यांचं जेवण असल्याचं म्हटलं, ज्यामुळे सोशल मीडियावर टीका झाली. नेटकरी आणि मराठी कलाकारांनी संताप व्यक्त केला. महेश टिळेकर यांनीही पोस्टद्वारे टीका केली. विवेक अग्निहोत्री यांनी 'द बंगाल फाईल्स'च्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं होतं.