‘मग आम्ही कसले सनातनी’, मुख्यमंत्री फडणवीसांच्या लेकीचा अस्वच्छतेवरून संताप
दिव्यज फाऊंडेशन आणि मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने जुहू समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, लेक दिविजा फडणवीस, अभिनेता अक्षय कुमार आणि महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी सहभाग घेतला. दिविजा फडणवीसने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती वापरण्याचे आवाहन केले. तिने तरुणांना स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.