दादरच्या कबुतरखान्याजवळ राडा, जैन समाज आक्रमक; ताडपत्री काढली, आत घुसले आंदोलक!
मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर मुंबई महानगर पालिकेने कारवाई केली. जैन समाजाने याला तीव्र विरोध दर्शवला. मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले, तरीही दादरमध्ये जैन समाज आक्रमक झाला. आंदोलकांनी कबुतरखान्यावर टाकलेली ताडपत्री फाडली, पोलिसांशी हुज्जत घातली आणि कबुतरांसाठी आणलेले खाद्य पसरवले.