“दादरच्या कबुतरखान्याजवळ राडा घालणारे बाहेरचे”, मंगलप्रभात लोढांचं विधान; “जे झालं ते…”
मुंबईच्या दादर परिसरात आज सकाळी कबुतरखान्याजवळ मोठा राडा झाला. मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय दिल्यानंतर महानगर पालिकेनं सर्व कबुतरखाने बंद केले. जैन समुदायाने याचा निषेध केला आणि आंदोलकांनी ताडपत्री फाडून आत प्रवेश केला. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गोंधळ घालणारे बाहेरचे लोक असल्याचे सांगितले आणि शांतता राखण्याचे आवाहन केले.