मुंबईत ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला नोएडात अटक
मुंबईत गणपती विसर्जनाच्या वेळी बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली होती. वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲपवर ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्ब आणि ४०० किलो आरडीएक्स असल्याचा संदेश प्राप्त झाला होता. या धमकीमुळे पोलीस सतर्क झाले होते. अखेर, नोएडा पोलिसांनी अश्विन कुमार सुप्रा या आरोपीला अटक केली असून, पुढील चौकशीसाठी त्याला मुंबईला आणले जात आहे.