अमित ठाकरेंनी घेतली भाजपा नेते आशिष शेलारांची भेट; बैठकीनंतर म्हणाले…
मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी भाजपाचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. त्यांनी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील काही महाविद्यालये आणि खासगी शाळांमध्ये होणाऱ्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षांमुळे कौटुंबिक तणाव निर्माण होऊ शकतो, असे अमित ठाकरे यांनी सांगितले.