Mumbai Train Blast: आरोपींना निर्दोष सोडण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती; आरोपी मात्र तुरुंगाबाहेरच राहणार
२००६ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील १२ आरोपींना निर्दोष ठरवण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केला आहे. मात्र, निर्दोष ठरलेल्या आरोपींना पुन्हा तुरुंगात जाण्याची आवश्यकता नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं. राज्य सरकारच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी उच्च न्यायालयाच्या निकालामुळे इतर प्रकरणांवर परिणाम होऊ शकतो, असं नमूद केलं.