मुंबई विमानतळाचं टर्मिनल १ पाडलं जाणार, पण नवी मुंबई विमानतळामुळे मिळतेय मुदतवाढ!
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी सुरू आहे. नवी मुंबई विमानतळावर टर्मिनल २ कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई विमानतळावरील टर्मिनल १ पाडण्यात येणार आहे. अदाणी एअरपोर्टच्या सीईओ अरुण बन्सल यांनी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हे नियोजन असल्याचे सांगितले. नवी मुंबई विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता २ कोटी असून, दुसऱ्या टप्प्यानंतर ती ५ कोटी होईल.