मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; ” नाशिक येथील कुंभमेळ्यात जास्त पर्वणी..”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची बैठक घेतली. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत १३ आखाड्यांचे प्रमुख साधू आणि कॅबिनेटमधील मंत्री उपस्थित होते. बैठकीत अमृत स्नान आणि शाही स्नानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. गोदावरी स्वच्छता, साधूग्रामची जागा अधिग्रहण, आणि कुशावर्तातील गर्दी व्यवस्थापनावर चर्चा झाली. फडणवीस यांनी कुंभमेळ्यासाठी ४००० कोटींच्या निविदा काढल्याचे सांगितले.