कार्तिक आर्यनचा Bhool Bhulaiyaa 3 ‘या’ तारखेला ओटीटीवर होणार प्रदर्शित
कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' चित्रपट १ नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि ३७ दिवसांत ४२९.२९ कोटींची कमाई केली आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित हा हॉरर कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांना आवडला. आता हा चित्रपट २७ डिसेंबरपासून नेटफ्लिक्सवर उपलब्ध होणार आहे. तृप्ती डिमरी, विद्या बालन, माधुरी दीक्षित यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 'सिंघम अगेन'लाही मागे टाकलं आहे.