नेटफ्लिक्सवर आहे सर्वात भयंकर हॉरर सीरिज, मिळालंय ८.५ रेटिंग
'द हॉंटिंग ऑफ हिल हाऊस' ही नेटफ्लिक्सवरील एक लोकप्रिय हॉरर सीरिज आहे, ज्याला आयएमडीबीवर ८.५ रेटिंग मिळालं आहे. माइक फ्लॅनागन दिग्दर्शित ही सीरिज एका विखुरलेल्या कुटुंबाच्या जुन्या घरातील भयानक आठवणी आणि घटनांवर आधारित आहे. भीती व भावनांची गुंतागुंत असलेल्या या सीरिजने नवीन बेंचमार्क सेट केला आहे. 'बेंट-नेक लेडी'ची ओळख आणि 'रेड रूम'चे रहस्य प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. रॉटन टोमॅटोजवर ९१% क्रिटिक स्कोअर आणि ९३% ऑडियन्स स्कोअर मिळाल्यामुळे ही सीरिज अत्यंत चर्चेत आहे.