Netflix वरून हटणार ‘हे’ ७ चित्रपट, सबस्क्रिप्शन असेल तर आताच पाहायला विसरू नका
अलीकडच्या काळात ओटीटीवर चित्रपट पाहण्याचं प्रमाण वाढलं आहे. नेटफ्लिक्सवरून जून महिन्यात काही चित्रपट हटवले जाणार आहेत. यामध्ये "ब्रेन ऑन फायर" (२२ जून), "ट्रॅप" (११ जून), "कॅरोल" (१७ जून), "ऑर्डिनरी पीपल" (२६ जून), "अमेरिकन स्नायपर" (२१ जून) यांचा समावेश आहे. "टू वीक्स नोटिस" आणि "मां" हे चित्रपट १ जूनला हटवले गेले आहेत.