‘पंचायत’ फेम अभिनेत्याने २१ दिवसांत सोडली ‘ही’ वाईट सवय, आता कशी आहे प्रकृती?
'पंचायत' फेम अभिनेता आसिफ खानच्या आरोग्याबद्दल अपडेट: आसिफ खानला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या लक्षणांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता तो बरा होत असून, त्याने धूम्रपानाची सवय सोडली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत, त्याने २१ दिवसांत धूम्रपान सोडल्याचं सांगितलं. तसेच, मित्रांना भेटण्याचं आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं.