Rise And Fall फेम अभिनेत्रीला जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या, नेमकं प्रकरण काय?
सोशल मीडियावर ट्रोलिंगचं प्रमाण वाढलं आहे. अभिनेत्री आहाना कुमराला भोजपुरी अभिनेता पवन सिंहच्या चाहत्यांकडून जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्या. शोमधील गैरसमज मिटवूनही तिला ऑनलाइन ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आहानाने या धमक्यांबद्दल शोच्या निर्मात्यांकडे तक्रार केली आहे. तिने या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आणि चाहत्यांच्या अशा वागण्याचं समर्थन केलं नाही.