विवेक अग्निहोत्रींचा बहुचर्चित ‘द बंगाल फाइल्स’ ओटीटीवर दाखल; कधी व कुठे पाहता येणार?
'द बंगाल फाईल्स' हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता आणि आता २१ नोव्हेंबर २०२५ पासून झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे. विवेक रंजन अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट पश्चिम बंगालच्या रक्तरंजित राजकीय इतिहासावर आधारित आहे. पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार आणि सिम्रत कौर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ओटीटीवर प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.