मोदींचा मार्ग मोकळा; सरसंघचालक मोहन भागवतांनीच दिले संकेत
रा. स्व. संघाच्या शताब्दी निमित्त आयोजित तीन दिवसांच्या व्याख्यानमालेत स्वतः सरसंघचालक मोहन भागवत यांनीच पंतप्रधान मोदींचा भविष्यातील मार्ग प्रशस्त असल्याचे संकेत दिले. याच महिन्यात मोदी ७५ वर्षांचे होत असून ते आता निवृत्त होणार का, या प्रश्नावर भागवत यांनीच पडदा टाकला आहे. त्यामुळे संघ आणि भाजपामध्ये सामंजस्य झाल्याचेही संकेत मिळत आहेत.