पुणे : महिलेने भेट म्हणून दिलेली भाजी पाहून अजित पवार म्हणाले, “घरी जाऊन बायकोला सांगतो…”
राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रमांतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात कार्यकर्त्यांच्या घरी भेटीगाठी घेत आहेत. खडकवासला येथील एका महिलेने त्यांना शेतातील ताजी भाजी भेट दिली. महिलेने सांगितले की, यंदा पाऊस खूप झाल्याने ओला दुष्काळ आहे, तरीही ही भाजी आणली आहे. अजित पवारांनी भाजी घरी नेऊन बायकोला शिजवायला सांगणार असल्याचे म्हटले. तर, या महिलेने त्यांच्या प्रभागाकडे लक्ष देण्याची विनंती केली.