अल्पवयीन मुलीवर दौंडमध्ये बलात्कार, महिलांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दागिन्यांवर दरोडा
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पंढरपूरला देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. दोन अज्ञातांनी कोयत्याचा धाक दाखवून महिलांचे दागिने लुटले आणि मुलीवर बलात्कार केला. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेवर रोहीत पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.