पुण्यातील सिंहगडावरुन बेपत्ता झालेल्या तरुणाचा पाच दिवसांनी लागला शोध
पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर फिरायला आलेला गौतम गायकवाड हा २४ वर्षीय तरुण २० ऑगस्ट रोजी बेपत्ता झाला होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी सातत्याने शोध घेतल्यानंतर, रविवारी संध्याकाळी गौतम सापडला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला शोधले. चौकशीनंतर तो कुठे गेला होता आणि कसा गायब झाला होता हे समजेल.