मुरलीधर मोहोळ ‘त्या’ व्हिडीओत कुणाची जाहिरात करतायत? धंगेकरांच्या आरोपांनंतर दिलं उत्तर!
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यात पुण्यात राजकीय वाद सुरू आहे. धंगेकरांनी मोहोळ यांच्यावर बांधकाम प्रकल्पाच्या जाहिरातीसाठी व्हिडीओ केल्याचा आरोप केला. मोहोळ यांनी हे आरोप फेटाळून लावत धंगेकरांच्या पराभवामुळे ते नैराश्यात असल्याचे म्हटले. त्यांनी धंगेकरांना वैफल्यग्रस्त माणूस म्हणत, जैन बोर्डिंग प्रकरणाची सत्यता तपासण्याचे आवाहन केले.