“तहसीलदार आरोपी क्र. १, तर पार्थ पवार…”, पुणे पोलीस आयुक्तांची महत्त्वाची माहिती
पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरण: पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ४० एकर जमीन खरेदी प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार अडचणीत आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर एफआयआर दाखल झाला. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, तहसीलदार आरोपी क्रमांक एक आहे, इतर आठ आरोपी आहेत.