“वैष्णवीचं लग्न त्यांनी दोनदा मोडलं होतं, हुंड्यासाठी वाद…”; अनिल कस्पटेंचा आरोप काय?
पुण्यातील वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. वैष्णवीच्या वडिलांनी सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. लग्नाच्या वेळी ५१ तोळे सोने, फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्या होत्या, तरीही आणखी पैशांची मागणी केली जात होती. या प्रकरणात वैष्णवीच्या पतीसह सासरच्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.