अमेरिकेला आवडेना, ट्रम्प मात्र TikTok च्या प्रेमात? सचिव म्हणतात, “१० कोटींहून अधिक …”
भारताने करोना काळात बंदी आणलेले TikTok अॅप अमेरिकेत अजूनही चालू आहे. अमेरिकेने चीनच्या या अॅपवर बंदी घालण्याची तयारी केली आहे. व्यापार विभागाचे सचिव हॉवर्ड ल्युटनिक यांनी ही माहिती दिली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना TikTok आवडतं, पण अमेरिकन सरकारने १७ सप्टेंबरपर्यंत चीनला निर्णय घेण्याची मुदत दिली आहे. जर TikTok अमेरिकी नियंत्रणाखाली आले नाही, तर त्यावर बंदी घालण्याची शक्यता आहे.