Bigg Boss मध्ये जायला आवडेल का? ‘आई कुठे काय करते’मधील अभिनेत्रीचं मजेशीर उत्तर; म्हणाली…
'बिग बॉस' हा लोकप्रिय टेलिव्हिजन शो आहे, ज्यात वादविवाद, भांडणं आणि टास्क असतात. सध्या हिंदी 'बिग बॉस'चा १९ वा सीझन सुरू आहे. 'बिग बॉस मराठी'चे पाच सीझन्स झाले असून, नव्या सीझनची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. मराठी अभिनेत्री गौरी कुलकर्णीला 'बिग बॉस'मध्ये पाहण्याची तिच्या चाहत्यांची इच्छा आहे. गौरीने इन्स्टाग्रामवर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना 'बिग बॉस'मध्ये जाण्याविषयी मजेशीर उत्तर दिलं.