‘सातव्या मुलीची…’ फेम अभिनेत्याची हिंदी मालिकेत एन्ट्री; पोस्ट शेअर करत म्हणाला…
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' फेम अभिनेता अभिजीत केळकर लवकरच हिंदी मालिकेत झळकणार आहे. 'मनपसंद की शादी' या मालिकेत तो दिसणार असून, त्याने इन्स्टाग्रामवर याबाबत माहिती दिली आहे. या मालिकेत मिलिंद गवळी, सुचित्रा बांदेकर, स्वाती देवल, इरावती लागू हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांतून झळकणार आहेत. मालिका ११ ऑगस्टपासून कलर्स वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे.