“लोकांना अक्कल नाही…” दादरच्या कबुतरखान्याबद्दल मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला…
मुंबईच्या दादर येथील कबुतरखाना बंद करण्याच्या निर्णयावर अभिनेता अभिजीत केळकरने संताप व्यक्त केला आहे. कबुतरांमुळे श्वसनाचे आजार होतात हे सिद्ध झाल्याने मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला. काही रहिवाशांनी विरोध केला असला तरी अभिजीतने महापालिकेच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून लोकांना कबुतरांच्या समस्येचे गांभीर्य समजून घेण्याचे आवाहन केले आहे.