मुंबईच्या वाहतूक कोंडीवर लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीचा संताप; व्हिडीओद्वारे दाखवली परिस्थिती
टीव्ही अभिनेत्री कश्मिरा शाहने मुंबईच्या मालाडमधील वाहतूक कोंडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. १५ ऑगस्ट रोजी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती गाडी चालवत असताना ट्रॅफिकमध्ये अडकली असल्याचे दिसते. कश्मिराने मराठी आणि हिंदी भाषेत या कोंडीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कश्मिरा नुकतीच 'लाफ्टर शेफ्स’ या कुकिंग रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती.