“या बाईला तर थोबडवावंसं वाटतं…”, ऐश्वर्या नारकरांवर केलेली टीका; म्हणाल्या…
चित्रपट किंवा मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना प्रेक्षकांकडून टीका सहन करावी लागते. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत नकारात्मक भूमिका साकारली होती. त्यामुळे सुरुवातीला प्रेक्षकांनी त्यांच्यावर टीका केली होती. यांचा अपघात होऊन या मरत का नाहीत? यांचं हे काय चाललंय? या बाईला तर थोबडवावंसंच वाटतं, मारावंसंच वाटतं अशा अनेक नकारात्मक प्रतिक्रिया त्यांना सहन कराव्या लागल्या होत्या.