“मी कुणाला सोडत नाही”, संकर्षण कऱ्हाडेच्या कवितेवर अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया
पुण्यातील अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वर्धापनदिन सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच्या कवितेवर मिश्किल टिपण्णी केली. पवारांनी संकर्षणला "कुणी माझ्या वाट्याला गेलं तर त्याला मी सोडत नाही" असं म्हणत शाळा घेतली. त्यांनी संकर्षणचं कौतुक करत त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात संकर्षणला आचार्य अत्रे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.