“साधना घरी येणार म्हणून…”, अक्षय केळकरने गृहप्रवेश करताना बायकोसाठी घेतला भन्नाट उखाणा
अभिनेता अक्षय केळकरने त्याची प्रेयसी साधना काकतकरबरोबर ९ मे रोजी पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. दोघे अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. लग्नानंतर अक्षयने व्लॉगद्वारे साधनाच्या पाठवणीचे क्षण आणि गृहप्रवेशाचे दृश्य शेअर केले. गृहप्रवेशाच्या वेळी अक्षयने साधनासाठी उखाणा घेतला, तर साधनानेही त्याच्यासाठी उखाणा घेतला. त्यांच्या लग्नाला इंडस्ट्रीतील अनेक कलाकार उपस्थित होते.