‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’ किती दिवस सुरू राहणार? मख्य अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाला…
'क्योंकि सास भी कभी बहू थी २' ही मालिका २९ जुलैपासून सुरू होत आहे. या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात अमर उपाध्याय आणि स्मृती इराणी पुन्हा एकत्र काम करत आहेत. अमरने सांगितले की, मालिकेच्या नव्या पर्वात काही बदल झाले आहेत, पण मीहिर आणि तुलसीची पात्रं तशीच आहेत. मालिकेचा टीआरपी चांगला असल्याने ती १० महिने किंवा वर्षभर चालेल, असा अंदाज आहे.