रक्षाबंधननिमित्त अंकिता वालावलकरने डीपी दादाला लिहिलं भावुक पत्र, ‘हे’ खास गिफ्टही दिलं
गेल्यावर्षी 'बिग बॉस मराठी'च्या घरात अंकिताने डीपीला राखी बांधली होती. यंदा भारतात नसल्याने ती डीपीला राखी बांधू शकत नाही, पण तिने त्याला खास गिफ्ट आणि भावुक पत्र पाठवलं आहे. डीपीने याचा व्हिडीओ युट्युबवर शेअर केला आहे. पत्रात अंकिताने डीपीदादाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. डीपीने तिला धन्यवाद देत, भारतात परतल्यावर गिफ्ट देण्याचं वचन दिलं आहे.