मित्राला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अविनाश नारकर यांची भावूक पोस्ट
अभिनेते अविनाश नारकर यांनी त्यांचा मित्र आणि अभिनेता अमोल बावडेकर यांच्यासाठी इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. अमोल यांना 'सुंदर मी होणार' नाटकाच्या प्रयोगापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. अविनाश यांनी व्हिडीओ शेअर करत देवाकडे अमोल यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. अमोल 'सुंदर मी होणार' आणि 'तुला जपणार आहे' यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होते.