‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, ‘पती पत्नी और पंगा’च्या सेटवर पार पडलं लग्न
हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री अविका गौरने तिचा प्रियकर मिलिंद चंदवानीसह 'पती पत्नी और पंगा'च्या सेटवर पारंपरिक पद्धतीने लग्न केले. 'बालिका वधू'मधील आनंदीच्या भूमिकेसाठी ओळखली जाणारी अविका गौरच्या लग्नासाठी अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. लग्नाच्या वेळी अविकाने लाल लेहेंगा आणि हिरवे दागिने परिधान केले होते, तर मिलिंदने क्रीम शेरवानी आणि गुलाबी फेटा घातला होता. दोघांनी लाँग डिस्टन्स रिलेशनशिप टिकवून अखेर लग्न केले.