घटस्फोटानंतर अडीच महिन्यांनी मराठमोळ्या अभिनेत्रीच्या पूर्वाश्रमीच्या पतीचे निधन
'भाभी जी घर पर हैं' फेम मराठमोळी अभिनेत्री शुभांगी अत्रे हिचा पूर्वाश्रमीचा पती पियुष पुरे याचे लिव्हर सिरोसिसमुळे निधन झाले आहे. घटस्फोटानंतर अवघ्या अडीच महिन्यांनी पियुषचं निधन झालं. शुभांगी व पियुष यांनी २००३ मध्ये लग्न केलं होतं आणि २२ वर्षे एकत्र राहिल्यानंतर नुकताच घटस्फोट घेतला. शुभांगीने मुलगी आशीची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे.