“मुंबईत घर घेणं सोपी गोष्ट नाही…”, तन्वी मुंडलेने विवेक सांगळेचं केलं कौतुक; म्हणाली…
'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेता विवेक सांगळेने मुंबईत स्वत:चं आलिशान घर खरेदी केलं आहे. त्याच्या या यशाबद्दल 'भाग्य दिले तू मला' फेम तन्वी मुंडलेने भरभरून कौतुक केलं आहे. तन्वीने विवेकच्या मेहनतीचं कौतुक करताना म्हटलं की, मुंबईत घर घेणं सोपं नाही, पण विवेकने स्वत:च्या बळावर हे साध्य केलं आहे. तन्वीने त्याच्या पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.