भाऊ कदम यांच्या निधनाची पसरली अफवा, लेक मृण्मयीने व्यक्त केला संताप; म्हणाली…
भाऊ कदम यांच्या निधनाची खोटी बातमी सोशल मीडियावर पसरवली गेली होती. याबद्दल त्यांची मुलगी मृण्मयी कदम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मृण्मयीने युट्यूब चॅनलवर व्हिडीओ शेअर करून ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले. तिने अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची माहिती दिली आहे. मृण्मयीने लोकांना अशा चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही केले आहे.