Bigg Boss फेम लोकप्रिय अभिनेत्रीनं सुरू केला स्वत:चा कॅफे, उषा नाडकर्णींनी केलं उद्घाटन
टीव्ही अभिनेत्री अर्चना गौतमने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर स्वत:चा कॅफे 'Oye Churros' सुरू केला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या हस्ते कॅफेचे उद्घाटन झाले. अर्चनाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत उषा नाडकर्णींचे आभार मानले. अर्चना 'बिग बॉस १६' आणि 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मधून प्रसिद्ध झाली होती. अभिनय क्षेत्रात यशस्वी झाल्यानंतर तिने आता उद्योग क्षेत्रात पाऊल टाकले आहे.