८५ हजार रुपयांचा ड्रेस खराब करून परत केला, पैसेही दिले नाहीत; अभिनेत्रीवर डिझायनरचा आरोप
'बिग बॉस १८' फेम अभिनेत्री कशिश कपूरवर एका डिझायनरने फसवणुकीचा आरोप केला आहे. डिझायनर स्मिता श्रीनिवास यांच्या मते, कशिशने ८५,००० रुपयांचा ड्रेस खराब अवस्थेत परत केला आणि भरपाई न देता ब्लॉक केले. डिझायनरने सोशल मीडियावर पुरावे शेअर केले आहेत. या अनुभवामुळे डिझायनरने इतरांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.