“माझ्या मुलाची चूक, त्याला माफ करा”, अमाल मलिकच्या वडिलांनी कुणाची मागितली माफी आणि का?
'बिग बॉस १९'च्या 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खानने अमाल मलिकला आवेज दरबारवर केलेल्या वैयक्तिक टीकेबद्दल फटकारलं. या वादामुळे अमालचे वडील डब्बू मलिक यांनी आवेजचे वडील इस्माईल दरबार यांची माफी मागितली. डब्बू मलिक यांनी आवेज आणि जैद यांना आपल्या मुलांसारखं मानलं आहे. इस्माईल दरबार यांनीही अमालच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. या वादामुळे शोच्या बाहेरही चर्चा वाढली आहे.