Video : “शी… किती घाण…”, अमालने केलं असं काही की…; व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल राग
टीव्हीवरील 'बिग बॉस 19' शोमध्ये स्पर्धक अमाल मलिकच्या एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर टीका होत आहे. या व्हिडिओमध्ये अमाल स्वयंपाकघरातील सिंकमध्ये थुंकताना दिसतो. प्रेक्षकांनी त्याच्या अस्वच्छ वागणुकीवर जोरदार टीका केली आहे. अमालच्या या कृत्याबद्दल सलमान खान काय प्रतिक्रिया देणार आणि त्याला काही शिक्षा होणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.