Bigg Boss 19 मधून ‘हा’ लोकप्रिय स्पर्धक पडणार बाहेर; वडिलांच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण
लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस १९’मध्ये ५० दिवसांनंतर स्पर्धा तीव्र झाली आहे. आतापर्यंत तीन स्पर्धक बाहेर पडले असून, या आठवड्यात अमाल मलिक बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. BB Insider HQ आणि अमालचे वडील डब्बू मलिक यांच्या ट्विटमुळे ही चर्चा जोर धरत आहे. अमालच्या आरोग्याच्या कारणामुळे त्याला शो सोडावा लागणार असल्याचं सांगितलं जात आहे.