‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार; मराठमोळ्या प्रणीत मोरेचा प्रवास संपणार?
टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस १९' सुरू होऊन ५० दिवस झाले आहेत. या आठवड्यात नॉमिनेशनसाठी ‘चेन टास्क’ ठेवण्यात आला आहे. यात प्रणीत मोरे, नेहल चुडासमा, गौरव खन्ना आणि बसीर अली नॉमिनेट झाले आहेत. प्रणीत मोरेला अधिक धोका असल्याचं म्हटलं जात आहे. आता या आठवड्यात कोण टिकणार आणि कोण घराबाहेर जाणार याची सर्वांना उत्सुकता आहे.