Bigg Boss 19 मध्ये मोठा ट्विस्ट, एक नव्हे तर ‘हे’ दोन स्पर्धक जाणार घराबाहेर; कारण…
'बिग बॉस १९' शोला दोन महिने झाले असून, खेळ अधिक स्पर्धात्मक होत आहे. या आठवड्यात गौरव खन्ना, प्रणीत मोरे, नेहल चुडासमा आणि बसीर अली नॉमिनेट झाले होते. 'फिल्म विंडो'नुसार, कमी मतांमुळे नेहल आणि बसीर घराबाहेर जातील. बसीरचा खेळ मंदावल्याने आणि नेहलसोबतच्या 'लव्ह अँगल'मुळे त्यांना शो सोडावा लागेल. अमाल मलिकच्या आरोग्यामुळे त्याच्याही बाहेर पडण्याच्या चर्चा आहेत.