प्रणित मोरेशी वाद घालणाऱ्या अमाल मलिकचा सलमान खानने घेतला चांगलाच समाचार, म्हणाला…
'बिग बॉस १९'च्या नवीन प्रोमोमध्ये सलमान खानने अमाल मलिकवर संताप व्यक्त केला आहे. अमालने घरात वापरलेल्या अर्वाच्य भाषेवर आणि इतर स्पर्धकांच्या कुटुंबांबद्दल केलेल्या वक्तव्यांवर सलमानने टीका केली. सलमानने अमालला त्याच्या वागणुकीबद्दल सल्ला दिला आणि त्याच्या टॅलेंटचं कौतुक केलं. या आठवड्यात अशनूर कौर, आवेज दरबार, नीलम गिरी, प्रणित मोरे, मृदुल तिवारी आणि गौरव खन्ना हे सहा स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत.