मराठमोळा प्रणीत मोरे, अमाल मालिक अन्…; या आठवड्यात एकूण ६ स्पर्धक नॉमिनेट, कोण जाणार घराबाहेर?
टीव्हीवरील लोकप्रिय शो 'बिग बॉस १९'मध्ये स्पर्धकांमध्ये चांगलीच लढाई सुरू आहे. या आठवड्यात अमाल मलिक, अशनूर कौर, नेहल चूडासमा, प्रणीत मोरे, मृदुल तिवारी आणि कुनिका सदानंद नॉमिनेट झाले आहेत. सलमान खानने अमाल आणि अशनूरच्या वादावर तीव्र प्रतिक्रिया दिली. या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार नाही, असे 'बिग बॉस ताजा खबर'ने म्हटले आहे. तसेच, वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून मालती चहर येणार असल्याचे वृत्त आहे.