Bigg Boss 19 मध्ये अमाल मलिकने केलेल्या आरोपांवर अबू मलिक यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
'बिग बॉस १९' शोमध्ये संगीतकार अमाल मलिक सहभागी झाला आहे. शोमध्ये त्याने काका अनु मलिक यांच्यावर टीका केली होती. त्यावर दुसरे काका अबू मलिक यांनी प्रतिक्रिया दिली की, अमाल संवेदनशील आहे आणि त्याच्या मनातील राग व्यक्त करतोय. घरातील वाद बाहेर मांडणं योग्य नाही. अबू मलिक यांनी अमालच्या वडिलांबरोबरच्या नात्यावरही भाष्य केलं.